च ते सहा प्रभाग वाढणार; आरक्षण बदलाचीही शक्यता
पुणे - महापालिकेची आगामी निवडणूक प्रभाग पद्धतीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसंख्या आणि हद्दवाढ लक्षात घेता प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यास सध्या असलेल्या प्रभागांची संख्या पाच ते सहाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, सध्या असलेल्या प्रभाग रचनेत आणि आरक्षणातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. ही निवडणूक प्रभाग की वॉर्ड पद्धतीने होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका होतील, असे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर माहिती घेतली असता, सध्या असलेल्या प्रभागांमध्ये नव्याने आठ वॉर्डांची भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या निवडणुका 2012 मध्ये दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने झाल्या होत्या. या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करताना 2001 ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली होती. त्या वेळी शहराची लोकसंख्या 25 लाख होती. मात्र, 2001 ते 2011 या दरम्यान वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन 76 प्रभाग तयार करण्यात आले होते. मात्र, आगामी निवडणुकांसाठी (2017) प्रभाग रचना करताना 2011ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या सुमारे 31 लाख 24 हजार आहे. 2012 मध्ये महापालिकेच्या हद्दीत येवलेवाडीचा समावेश नव्याने झाला, त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत नव्याने साठ हजार लोकसंख्येची भर पडली. तसेच, गेल्या पाच वर्षांत उपनगरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली, त्यामुळे तेथील लोकसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी (2014) विधानसभा निवडणूक झाली, त्या वेळी ही गोष्ट निदर्शनास आली. उदा. पालिका निवडणुकीत बिबवेवाडी येथील प्रभाग क्रमांक 72 ची लोकसंख्या 32 हजार होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळेत या प्रभागाची लोकसंख्या 45 हजारांपर्यंत झाल्याचे दिसून आले. अशाच प्रकारे रामनगर येथील मतदारांची लोकसंख्या सात हजारांवरून 20 हजारांपर्यंत गेल्याचे आढळून आले. एकूणच शहरातील मतदारांची संख्या चार लाखांहून अधिक वाढली असल्याचे दिसून आले. 2014
ते 2016 या दरम्यान वाढलेली लोकसंख्या विचार घेतली तर शहराची लोकसंख्या जवळपास 36 लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीमध्ये 24 लाख लोकसंख्येसाठी 145 वॉर्ड, तर त्यापुढील प्रत्येक एक लाखामागे एक वॉर्ड ग्राह्य धरावा, असे म्हटले आहे. त्यानुसार 2012 च्या निवडणुकीमध्ये 76 प्रभाग झाले. या न्यायानुसार 2017 ला होणाऱ्या निवडणुकीसाठी किमान 81 किंवा 82 प्रभाग होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या असलेल्या प्रभागात किमान पाच प्रभागांची नव्याने भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यदाकदाचित प्रभागाऐवजी वॉर्ड रचनेनुसार निवडणुका झाल्या, तरी सध्या असलेल्या वॉर्डांच्या (152) संख्येत सुमारे दहा ते बारा वॉर्डांची नव्याने भर पडण्याची शक्यता आहे.
लोकसंख्येत चार लाखांची भर
केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते, त्यानंतर प्रत्येक वर्षात लोकसंख्येत किती भर पडते, याचे मोजमाप करण्यासाठीचे परिमाण दरवर्षी होणारे जन्म-मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी सुमारे दोन ते सव्वादोन टक्क्यांनी लोकसंख्येत भर पडते, असे सांगण्यात आले. या परिमाणानुसार गेल्या पाच वर्षांत शहराच्या लोकसंख्येत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय स्थलांतरितांचे प्रमाणही विचारात घेतले जाते. त्यामुळे 2012 ते 2016 (अखेर) पर्यंत शहराच्या लोकसंख्येत किमान साडेतीन ते चार लाखांची भर पडेल, असे गृहीत धरून प्रभाग अथवा वॉर्ड रचना करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसंख्या वाढल्यामुळेही प्रभागाची रचना बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी
वाढलेली हद्द आणि लोकसंख्येमुळे सध्याच्या प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे सध्या असलेले आरक्षणही बदलणार आहे. परिणामी, अनेक नव्यांना संधी मिळण्याचीही शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment