आगामी महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना यंदा प्रथमच महापालिकेऐवजी राज्य निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या "महाऑनलाइन‘ या संस्थेकडून तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सेन्सेक्स ब्लॉक (प्रगणक गट) महापालिकेकडून निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग रचना करताना होणारा राजकीय हस्तक्षेप टाळण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. यंदाची निवडणूक चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग अशा पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रभागाची रचना कशी असणार याबाबत सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी दोन वेळा महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने झाली होती. मात्र, तेव्हा जास्तीत जास्त तीन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्यात आला होता. चार वॉर्ड असलेले दोनच प्रभाग होते. यंदा मात्र किमान चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार आहे.
प्रभाग रचना करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "महाऑनलाइन‘ची नेमणूक केली आहे. त्यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेल्या सेन्सेक्स ब्लॉक डिजिटल स्वरूपात पाठवून देण्याच्या सूचना आयोगाने महापालिकेला केल्या होत्या. गुगल मॅपच्या मदतीने शहराच्या हद्दीच्या नकाशावर महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या सेन्सेक्स ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकसंख्या आणि नैसर्गिक हद्द (नदी, नाले, मोठे रस्ते) हे विचारात घेऊन प्रभागाची हद्द निश्चित केली जाणार आहे. अशा पद्धतीने ही प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा महापालिकेकडे पाठविला जाणार आहे. त्यावर महापालिकेकडून हरकती- सूचना मागविण्यात येतील. दाखल हरकतींवर सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम केली जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचेही सांगण्यात आले.
शहरात होणार 38 प्रभाग
2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या 31 लाख 32 हजार एवढी ग्राह्य धरण्यात आली आहे. मध्यंतरी राज्य सरकारकडून येवलेवाडीचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार येवलेवाडीची लोकसंख्या 7 हजार एवढी ग्राह्य धरून शहराची ही लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. ही लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचना केली जाणार आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग या सूत्रानुसार शहरात एकूण 38 प्रभाग होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एक प्रभाग ऐंशी हजारांचा
चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग होणार आहे, त्यामुळे एका प्रभागातील लोकसंख्या किमान 80 ते 82 हजारांची असणार आहे. तर, एका प्रभागातील मतदारांची संख्या किमान 55 ते 60 हजारांपर्यंत असणार आहे. सध्या महापालिकेची सदस्य संख्या ही 152 आहे. लोकसंख्या वाढली असली आणि येवलेवाडीचा समावेश झाला असला तरी सध्याच्या सदस्य संख्येत वाढ होण्याची शक्यता नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment