Wednesday, 2 November 2016

अशी झाली प्रभाग रचना

प्रभाग रचना करताना महापालिकेच्या 2011च्या जनगणनेनुसार माहितीचा आधार घेण्यात आला आहे. जनगणना करण्यासाठी एका प्रगणकाकडे 100-125 घरे देण्यात आली होती. त्यात सुमारे 500-700च्या व्यक्तींच्या तपशीलाची नोंद आहे. त्यामुळे एका प्रगणकाचा एक ब्लॉक तयार झाला. शहरातील 31 लाख 32 हजार 143 लोकसंख्या सुमारे 6 हजार 150 ब्लॉकमध्ये विभागली गेली. प्रभाग तयार करण्यासाठी जनगणना कार्यालयाने महापालिकेला हे ब्लॉक दिले होते. त्याचा आधार घेत आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रभाग तयार करण्यात आला. अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने 24 प्रभाग निश्‍चित करण्यात आले. त्यातून सोडतीद्वारे महिलांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. तर, नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे प्रमाण 27 टक्के ठेवण्यात आले होते. या आरक्षणांचा आधार घेऊन अंतिम प्रभाग तयार झाले. त्यामुळे अनुसूचित जातींसाठी 22, अनुसूचित जमातींसाठी 2 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 44 प्रभागांत आरक्षण ठेवण्यात आले. या आरक्षणात आणि उर्वरित जागांत सर्वसाधारण महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले. 

चार सदस्य प्रभागात 
-सर्वाधिक लोकसंख्या - 85026 - प्रभाग क्रमांक 9 - बाणेर, बालेवाडी, पाषाण 
- सर्वात कमी लोकसंख्या - 69982 - प्रभाग क्रमांक 30- जनता वसाहत, दत्तवाडी 

No comments:

Post a Comment