क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दींची फेररचना झाल्याने प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांची गणिते बदलणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, तर भाजप, कॉंग्रेस, मनसेचे प्रत्येकी एका प्रभाग समितीवर थेट वर्चस्व निर्माण होणार आहे. इतर ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतील तडजोड आणि मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिकेची निवडणूक यंदा द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या 144 वरून 152 पर्यंत पोचली आहे. सध्या महापालिकेच्या 14 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कामकाज पाहिले जात आहे. प्रशासकीय कामात सुलभता येण्याकरिता आणखी एक क्षेत्रीय कार्यालय कोंढवा येथे सुरू करण्यास पक्षनेत्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. नवीन क्षेत्रीय कार्यालयांतंर्गत प्रभाग क्रमांक 45, 46, 61, 62, 63 यांचा समावेश आहे. यामध्ये कॉंग्रेसचे तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन भाजप शिवसेना युतीचे चार, तर मनसेचा केवळ एकच सदस्य आहे. पक्षीय बलात युती पुढे असली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकत्रित संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे येथे मनसेच्या मताला महत्त्व आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला नगर रस्ता, संगमवाडी, हडपसर आणि धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग समितीचे अध्यक्षपद कोणाच्याही मदतीशिवाय मिळू शकते. या चार क्षेत्रीय कार्यालयात त्यांच्या नगरसेवकांचे बहुमत आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे प्रत्येकी चार नगरसेवक असल्याने येथे आघाडीचे राज्य आहे. कोथरूड हा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. या वेळी कोथरूड क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती युतीच्या हातातून गेली आहे. या ठिकाणी कॉंग्रेसचे चार, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नगरसेवक आहे. युतीचे दोन, मनसेचे तीन नगरसेवक असे संख्याबळ आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीमध्ये कॉंग्रेस 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 2 असे वर्चस्व आहे. मनसेचे सर्वांत जास्त नगरसेवक असल्याने, ते भाजपची दोन मते मिळवून अध्यक्षपद पटकावू शकतात. ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयात मनसेचे वर्चस्व आहे. त्यांचे पाच, युती आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नगरसेवक आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय प्रभाग समितीत कॉंग्रेस 4 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस 3 असे संख्याबळ असल्याने येथे विरोधी पक्षांना संधी नाही. सहकारनगर क्षेत्रीय प्रभाग समितीमध्ये कॉंग्रेस 2 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस 3 यांचे बहुमत आहे. युती आणि मनसे एकत्र आले तरच येथे चित्र बदलू शकते. टिळक रस्ता क्षेत्रीय प्रभाग समितीमध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांचे प्रत्येकी चार असे समान संख्याबळ आहे. भाजप शिवसेना युतीला बिबवेवाडी आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू शकते. तेथे त्यांचे पाच नगरसेवक असून, कॉंग्रेसचे दोन, मनसेचे तीन नगरसेवक असल्याने कॉंग्रेस निर्णायक ठरेल. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भाजपचे सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेचा एक नगरसेवक आहे. ही प्रभाग समिती पाच वर्षे भाजपकडेच राहील, तर वारजे क्षेत्रीय कार्यालयात युतीचे संख्याबळ इतरांपेक्षा जास्त असले तरी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस 3 आणि मनसे 3 यांच्याशी तडजोडीचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.
स्वीकृत सदस्यत्वासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीत गर्दी
पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी सोमवारी (ता. 30) अर्ज दाखल होणार आहेत. या पदासाठी दोन्ही कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप आणि मनसेकडून यापूर्वीच या पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, तर संख्याबळ अपुरे असल्यामुळे शिवसेनेचा एकही सदस्य या पदावर जाऊ शकणार नाही.
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पाच सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सभागृहातील पक्षीय बलाबल लक्षात घेऊन ही नियुक्ती होणार आहे. त्यामुळे महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला पाचपैकी दोन जागा येणार आहेत. या दोन जागांसाठी पक्षामध्ये इच्छुकांची मोठी फौज आहे.
त्यामध्ये अप्पा रेणुसे, प्रदेशचे सरचिटणीस रवींद्र माळवदकर, भगवान साळुंके, म. वि अकोलकर, कासम शेख, इक्बाल शेख यांच्यासह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार, याबाबत पक्षात उत्सुकता ताणली गेली आहे; तर कॉंग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. एका जागेसाठी पक्षाकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले आहेत. अजित आपटे, अरुण धिमधिमे, अजित दरेकर, बाळासाहेब मारणे यांच्यासह माजी सभासदांचा त्यामध्ये समावेश आहे.
भाजपकडून या पदासाठी यापूर्वीच शहराध्यक्ष विकास मठकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे, तर मनसेकडून शहराध्यक्ष बाळा शेडगे यांना संधी देण्यात आली आहे. सदस्यसंख्या कमी असल्यामुळे यंदा प्रथमच शिवसेनेला संधी मिळणार नाही. उद्या सकाळी बारा वाजता या पदासाठी अर्ज भरावयाचे आहेत. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसमधील इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

No comments:
Post a Comment